Pune-Lonavala Local: पुणे-लोणावळा लोकल गुरुवारपासून धावणार, मात्र…

तूर्त तरी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच करता येणार लोकलने प्रवास

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोकल येत्या गुरुवारपासून (आठ ऑक्टोबर) पुन्हा सुरू होणार आहेत, मात्र तूर्त तरी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. त्याबाबतची नियमावली एक-दोन दिवसांत नोडल ऑफिसर असणारे पुण्याचे पोलीस आयुक्त जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंधांसह पुणे परिसरातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आदेशात यासंदर्भातील उल्लेख आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या धर्तीवर पुणे क्षेत्रातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

पुणे रेल्वे विभागातील लोकलसेवा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे पुणे- लोणावळा या लोहमार्गालगत राहणाऱ्या लोकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. राज्य शासनाने लोकल सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

राज्य शासनाने अनलॉक 5 ची नियमावली आणि आदेश जाहीर केले आहेत. हा अनलॉक 5 हा 1 ते 31 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. यामध्ये राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वे देखील सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

पुण्यातील लोकलसेवा सुरू करतानाच कोरोनाच्या अनुषंगाने काळजी, खबरदारी घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.