pune : पीएमपीला दिवसाला 70 लाखांचा तोटा

एमपीसी न्यूज : शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीचा तोटा गतवर्षीच्या तुलनेत दिवसाला 14 लाखांपर्यंत वाढून तो 70 लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे तोटा होत असतानाच उत्पन्नही दहा लाखांनी कमी झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

नव्या गाडय़ांच्या खरेदीला झालेला विलंब, जुन्या आणि आयुर्मान संपलेल्या गाडय़ांवरील देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च, नादुरुस्त गाडय़ांमुळे संचलनात येत असलेले अडथळे, इंधन दरवाढ आणि आस्थापनेवरील खर्च यामुळे तोटा होत असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जवळपास दहा लाख प्रवाशांना पीएमपीकडून सेवा दिली जाते. मात्र पीएमपीच्या निष्क्रिय कारभारामुळे उत्पन्न कमी आणि तोटा जास्त असेच चित्र अलीकडच्या काही वर्षांत पुढे आले आहे. यासंदर्भात पीएमपीला मिळणारे उत्पन्न, खर्च आणि होत असलेला तोटा यासंदर्भात नगरसेवक आबा बागुल यांनी महापालिकेच्या मुख्य सभेच्या प्रश्नोत्तराद्वारे लेखी विचारणा केली होती. त्यावर पीएमपीने दिलेल्या उत्तरातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1