Pune : एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग 2018 चे उदघाटन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित ‘एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग 2018 ‘ चे उदघाटन सोमवारी (दि. 6) राज्य स्तरीय बॅडमिंटनपटू सुधांशु मेडसीकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्राचार्य अनिता फ्रांत्झ उपस्थित होत्या. या स्पर्धेत एकूण पुण्यातील 12 संघानी भाग घेतला असून त्यात हॉटेल्स आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. ही स्पर्धा 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे . आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे ही स्पर्धा सुरु राहणार असून 9 ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण होईल .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.