Pune : कोविड- 19 लसीसाठी एम-आरएनए उपयुक्त – डॉ. स्वर्णलता सराफ 

एमपीसी न्यूज – ‘एन्फ़्लुएन्झा आणि कोविड-19 सारख्या विषाणू विरुद्ध पारंपारिक लसी प्रभावी ठरत नाहीत. आरएनएवर आधारित लसी तयार करण्यास लागणारा कमी कालावधी आणि प्रभाव पाहता ती लस कोविड – 19 वर उपयुक्त ठरू शकते,  असे प्रतिपादन पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठाच्या फार्मास्युटीकल सायन्स विभागप्रमुख डॉ.स्वर्णलता सराफ यांनी केले आहे.

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसीने मंगळवारी (दि.12)  आयोजित केलेल्या ‘एम-आरएनए लस निर्मिती’ या विषयावरच्या वेबीनारमध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.  कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ.किरण भिसे यांनी स्वागत केले.

डॉ. सराफ म्हणाल्या, ‘आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कोणत्याही बाह्य आक्रमणाविरुद्ध लढत असते. बाहेरून रोग प्रतिकारक लस टोचणे हे रोगांच्या साथींवर आजवर मात करीत आलेले आयुध आहे.लसींचे फर्स्ट जनरेशन व्हेक्सीन ,सेकंड जनरेशन व्हेक्सीन, टोक्सिड व्हेक्सीन, डीएनए व्हेक्सीन, आरएनए व्हेक्सीन असे प्रकार आहेत.

विषाणू शरीरात घुसल्यावर पेशी, प्रथिने यांच्या मदतीने संसर्ग पुढे जाण्याची प्रक्रिया सुरु होते. एम-आरएनएचा सिक्वेन्स विशिष्ट रोगाच्या एन्टीजेनने तयार झाला तर शरीराची प्रतिकार शक्ती तो ओळखू शकते आणि मुकाबला करू शकतो. एम आरएनए लसीच्या निर्मितीला   कमी कालावधी लागतो आणि ही लस प्रभावी देखील ठरते.

रुग्णासाठी ही लस सुरक्षित असते.त्यामुळे कोरोना सारख्या साथीमध्येउपयुक्त ठरते. ही लस प्रयोगशाळेत तयार होते आणि साथीच्या वेळेस मोठ्या प्रमाणवर निर्मिती शक्य असते. शिवाय ती  कमी खर्चात तयार होवू शकते.

सार्स आणि कोविड विषाणू मुळे शरीरात होणाऱ्या परिणामांची माहितीही डॉ. सराफ यांनी यावेळी दिली.  डॉ. कांचन चव्हाण, डॉ.राणी पोटावळे, अमृता यादव, रजत सय्यद यांनी संयोजनात सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.