Pune : राज्यात स्थापन होण्याआधीच पुणे महापालिकेत महाआघाडी

एमपीसी न्यूज – राज्यात शिवसेना – काँगेस – राष्ट्रवादीची महाशिव आघाडी स्थापन होण्यापूर्वीच पुणे महापालिकेत आज महापौर – उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महाशिव आघाडी स्थापन झाल्याचे पाहायला मिळाले.

शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांनी भाजपला चिमटा काढत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, यामधील मी पणा घालविल्याचे सांगितले. त्यावर भाजप नगरसेवक उमेश गायकवाड यांनी आम्ही आता जरी नसलो तरी आम्हीच पुन्हा येणार असल्याचे जाहीर केले. आम्हीच पुन्हा येणार असल्याचे नगरसेवक दीपक पोटे यांनी सांगितले. महाशिव आघाडीचे उमेदवार म्हणून प्रकाश कदम आणि चांदबी हाजी नदाफ यांचा उल्लेख करण्यात आला. ही निवडणूक पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी पूर्णपणे भरली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.