Pune : अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत महा मेट्रो प्रथम

अकराव्या 'अर्बन मोबिलिटी इंडिया' परिषदेची यशस्वी सांगता

एमपीसी न्यूज – अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया 2018 परिषदेत महा मेट्रोला बेस्ट एक्झिबिशन स्टॉल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित तीन दिवसीय अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया 2018 परिषदेची रविवार (दि. 4) सांगता झाली. या समारोहात विविध स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.

समारोपाच्या कार्यक्रमासाठी खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, अतिरिक्त सचिव केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास विभाग, भारत सरकार संजय मूर्ती आणि प्रधान सचिव नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन नितीन करिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या भाषणाने समारोप कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. दीक्षित यांनी ‘चला नागपूर’ संकल्पनेची प्रशंसा करत हा चौथा सर्वात मोठा आऊट रिच डे उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जीआयझेड यांचे विशेष आभार मानले. यासह वॉकथॉन आणि ग्रीन कार्निवल उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. विदेशातून, देशाच्या विविध राज्यातून आणि शहरातुन आलेल्या प्रतिनिधींनी ही परिषद ऐतिहासिक बनविण्यात महत्वाची भूमिका बजावली.

अर्बन मोबिलिटीसंबंधी आराखडा राज्य सरकारच्या नगर विकास खात्यातर्फे तयार झाला असून या क्षेत्रातील तज्ञांनी आणि इतर नागरिकांनी आराखड्याचा अभ्यास करून यावर सूचना पाठवाव्या ही अपेक्षा नितीन करिर यांनी व्यक्त केली. नागपुरात आयोजित परिषदेच्या प्रत्येक टप्प्यात झालेल्या चर्चासत्रांची त्यांनी प्रशंसा केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर चर्चा होणे आज काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोचे नियोजन, फूटपाथ निर्माण करण्यासाठी योग्य आराखडा तयार करणे आवश्यक आहे. वर्तमान काळात केवळ अर्बन मोबिलिटीची संकल्पना वाढत्या खाजगी वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करू शकेल. असे मत करीत यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अनोख्या कल्पनेतून राबविण्यात येणारी ब्रॉडगेज संकल्पनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होण्यास मदत मिळेल. ग्रीन रिव्हॉल्युशन ट्रान्सपोर्ट प्रदूषण रहित असेल. आजची एन्ड ऑफ कॉन्फ्ररेन्स उद्याची स्टार्ट ऑफ पोल्युशन फ्री लाईफ असेल असे वक्तव्य खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

बाराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया 2019 चे आयोजन लखनऊ येथे 15 ते 17 नोव्हेंबर, 2019 दरम्यान होणार असल्याचे संजय मूर्ती यांनी सांगितले.

अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेंस 2018 चे विजेते –

प्रथम – महा मेट्रो
द्वितीय – चलो
तृतीय – अल्ट्रा पीआरटी लिमिटेड

# बेस्ट नॉन मोटराईजड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट – कोची मेट्रो रेल लिमिटेड
# बेस्ट सिटी बस सर्विस – कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि बेंगलुरू मेट्रो पॉलीटन ट्रान्सपोर्ट कोर्पोरेशन
# बेस्ट अर्बन मास्ट ट्राजिंट प्रोजेक्ट – हैद्राबाद मेट्रो रेल लिमिटेड आणि सुरत महानगरपालिका
# बेस्ट इंटेलिजट ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि आटोमेटीक फेयर कलेव्क्षन सिस्टम – सुरत महानगरपालिका
# बेस्ट इनिशिएटीव फॉर इमप्रूव्हड रोड सेफ्टी – मध्यप्रदेश पोलीस
# बेस्ट सिटी इन अर्बन ट्रान्सपोर्ट इनिशिएटीव – अहमदाबाद महानगरपालिका
# बेस्ट नॉन मोटराईजड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट – बृहत बेंगलुरू महानगरपालिका
# बेस्ट सिटी बस सर्विस – बिहार रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि मणिपूर रोड ट्रान्सपोर्ट
# बेस्ट इंटेलिजट ट्रान्सपोर्ट सिस्टम – अहमदाबाद जनमार्ग लिमिटेड आणि नवी मुंबई म्युनिसीपल ट्रान्सपोर्ट
# बेस्ट इनिशिएटीव फॉर इमप्रूव्हड रोड सेफ्टी – आंध्रप्रदेश पोलीस
# बेस्ट सिटी इन अर्बन ट्रान्सपोर्ट इनिशिएटीव – सुरत महानगरपालिका आणि हिमाचल रोड स्टेट ट्रान्सपोर्ट
# हॅकाथॉन स्पर्धा –
पहिला पुरस्कार अवनी मेहता
दुसरा पुरस्कार कुशाघ्र सिन्हा
उत्तेजनार्थ पुरस्कार अनुपमा वरीयार आणि मधुर कुकरेजा
# उत्कृष्ट पोस्टर स्पर्धा – जेनीज जोज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.