Pune: महाराष्ट्रीयन नर्सेसवरील अन्यायाविरूद्ध स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचे सिम्बॉयसिस हॉस्पिटलला निवेदन

Pune: Maharashtra State Private Nurses Union's statement to Symbiosis Hospital against injustice against Maharashtrian nurses या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मराठी नर्सेसचा केरळच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ तसेच गलिच्छ भाषा वापरून वारंवार अपमान केला जात आहे.

एमपीसी न्यूज- लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर याठिकाणी महाराष्ट्रीयन नर्सेसवरील अन्याय होत असल्याची बाब समोर आली. महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचे याची दखल घेत सिम्बॉयसिस हॉस्पिटलला निवेदन दिले आहे.

या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मराठी नर्सेसचा केरळच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ तसेच गलिच्छ भाषा वापरून वारंवार अपमान केला जात आहे.

याप्रकरणी मराठी नर्सेसने महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन कडे त्यांची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनने आयोजित केलेल्या बैठकीत या सर्व मुद्द्यावर चर्चा केली व त्यांना निवेदन देण्यात आले.

यावर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नटराजन यांनी या प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी पुणे कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॅनियल डिसूजा उपाध्यक्ष दिपाली केंजळे जिल्हा सचिव स्वप्नील शिंगे व जिल्हा संघटक सचिन कसोट व अशोक आगुंडे हे उपस्थित होते.

प्रायव्हेट नर्सेसवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन कायम उठवेल, असे आश्वासन युनियनचे अध्यक्ष डॉनियल डिसुझा यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.