Pune : सहकारी बँक चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज – सहकारी बँक चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. दिल्लीत युपीए सरकार असताना.प्रणब मुखर्जी यांना भेटलो होतो. सहकार क्षेत्रातील बॅका यशस्वी चालतात. हे पाहून ते आश्चर्य वाटले, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. तर आर्थिक क्षेत्रात विश्वास, प्रामाणिकता आणि इमानदारी हे सर्वात मोठे कॅपिटल असल्याचे त्यांनी सांगितले.

जनसेवा सहकारी बँकेच्या हडपसर येथील मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संचालक पाश्चिम महाराष्ट्राचे नानासाहेब जाधव, बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीच योगदान फार मोठे असून या सहकार चळवळीत टीम स्पिरीट महत्वाचे आहे. तर संचालकांची तोंड एका दिशेने असण्याची आवश्यकता आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विमान सेवेमध्ये स्पर्धा वाढल्याने सर्व नागरिकांना प्रवास करणे शक्य झाले असून त्याचा फायदा प्रत्येक घटकाला झाला आहे. त्यामुळे आता मी पाण्यावर उडणारी विमानावर विचार करीत आहे.

ते पुढे म्हणाले की, काहीजण मला सिव्हिल इंजिनिरिंगच समजतात पण, मला सिव्हिल इंजिनियरिंगच काहीच समजत नाही. तरी देखील मी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अनेक रस्ते, उड्डाणपूल बांधले. कारण, मला कमी वेळेत खूप काम करायच एवढंच लक्षात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.