BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गांधीजींच्या रक्षा पात्राच्या चोरीचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे निषेध

0

एमपीसी न्यूज- मध्यप्रदेशातील रीवा या शहरामध्ये मध्ये दि. 2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी तेथील महात्मा गांधींच्या रक्षापात्राची चोरी झाली. शिवाय तेथील महात्मा गांधींच्या चित्रावर ‘गद्दार’ असे शब्द लिहिण्यात आले, या घटनेचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन यांनी पत्रकाद्वारे निषेध केला आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,
या गंभीर घटनेची गंभीर दखल ना राज्य सरकारने घेतली, ना केंद्रसरकारने व ना माध्यमांनी घेतली. राष्ट्रपित्याचा अवमान करणारा हा प्रकार अतिशय संतापजन्य व निषेधार्य आहे. या निंदनीय घटनेचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी निषेध करीत आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराचा त्वरित शोध घ्यावा अशी मागणी राज्यसरकार व केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. गांधींच्या रक्षापात्र सरकारने ताब्यात घ्यावे आणि त्याचे सन्मानाने नदीत विसर्जन करावे. असेही या पत्रकात म्हटले आहे.

अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात गांधीचे वास्तव्य होते. ही जागा देशातील व परदेशातील अनेकांना प्रेरणा देणारी जागा आहे. या आश्रमाची देखभाल करणाऱ्या विश्वस्तांना त्यांच्या ताब्यात असलेल्या आश्रमाची जागा ताबडतोब सोडण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. सरकारचे हे पाऊल खूप चिंताजनक आहे. महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात साधेपण व पावित्र्य हे महत्वाचे आहे. आश्रमाचे पावित्र्य टिकवून ठेवावे. शासनाने ही जागा ताब्यात घेतल्यास त्याचा व्यापारी उपयोग होईल अशी भीती आहे. गांधी विचाराशी विपरीत असलेल्या प्रवृत्तीचेही ते केंद्र ठरेल अशी शंका आहे. त्यामुळे आश्रमाची जागा ताब्यात घेण्याची नोटीस त्वरित मागे घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने सरकारकडे केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3