Pune : शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, एक लाख रुपये, मानचिन्ह, फुले पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या 128 व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी 28 नोव्हेंबर रोजी ‘समता दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समता भूमी, महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, महात्मा फुले पेठ, पुणे येथे सकाळी 9:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो फुले-शाहू- आंबेडकर अनुयायी उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यीतील विविध ठिकाणांहून येणाऱ्या समता ज्योतीचे स्वागत महात्मा फुले वाडा येथे केले जाणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.