Pune : माजी सैनिक संघटनेकडून आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन

एमपीसी न्यूज – कोरोना संकटावर मात करण्यासाठी सक्षमपणे लढा देणा-या आरोग्य यंत्रणा व पोलिस यंत्रणेचे माजी सैनिक संघटना व व नवभारत मानवतावादी संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांना आरोग्य किट व संघटनेचा कर्मयोगी विशेषांक भेट देण्यात आला.

याप्रसंगी अधिष्ठाता व सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे डॉ. अजय चंदनवाले,  वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. तावरे, प्राध्यापक व विभागप्रमुख कान नाक घसा विभाग डॉ. समीर जोशी तसेच डॉ. कदम, डॉ. गायकवाड, डॉ. सांगळे, डॉ. बोरसे आणि बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील, नायडू हॉस्पीटलमध्ये कोरोना पेशंटवर उपचार करत असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचा-यांना मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉशचे वाटप करुन ते करत असलेल्या कामाला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, कोषाध्यक्ष निरंजन काकडे, अंबादास पालवे तसेच संघटनेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जगावर ओढावलेल्या कोरोना या विषाणू विरोधातील युध्दजन्य स्थितीत माजी सैनिक स्वेच्छेने सेवा देण्यास तयार आहेत व तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. एकविसाव्या शतकातील ही लढाई शिस्तबध्द पध्दतीने वैद्यकीय तज्ञांच्या दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केल्यास जिंकता येईल. त्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त, स्वच्छता व संयमाने सैनिकासारखे लढण्याची आवश्यकता आहे, असे प्रकाश भिलारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.