Pune : कारने टेम्पोला दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा मृत्यू ,चारजण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने टेम्पोला दिलेल्या जोरदार धडकेत कारमधील दोघांचा मृत्यू झाला. तर टेम्पोचालकासह इतर तिघेजण जखमी झाले. हा अपघात काल शुक्रवारी (दि.23) पहाटे दीडच्या सुमारास पुणे विद्यापीठापासून जवळ औंध रस्त्यावर झाला.

राहुल रामचंद्र नायर(वय 28, रा. औंध), प्रतिक प्रमोद रामशैट्टीवार(वय 29, रा.रयतवाडी,चंद्रपूर) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत तर रोहीत बरमन (रा.औंध), निलम अस्वाल नेगी (रा.पिंपळे सौदागर) आणि स्वत: कारचालक हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी शिवाजी जगदाळे (वय 32, रा. लक्ष्मीनगर,जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी जगदाळे हे त्यांचा टेम्पो घेऊन औंध रोडने सांगवीला त्यांच्या घरी निघाले होते. त्यावेळी अचानकपणे औंधकडून शिवाजीनगरकडे जाणा-या कारचालकाने भरघाव वेगात कार चालवून रस्तादुभाजक ओलांडून टेम्पोस जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी जखमी होऊन त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच कारमधील चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर कारचालक स्वत: आणि अन्य दोघेजण जखमी झाले.

याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.