Pune : भरधाव ट्रकच्या धडकेत तीनजण ठार, दोन गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- हडपसर-सासवड मार्गावर वडकी येथे भरधाव ट्रकने दोन मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर एका महिलेसहित एक 11 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी वडकी येथील ग्रेटिंग हॉटेलसमोर घडला.

सोमेश्वर शंकर मोडक (वय 42,रा. वडकी पिंपळमळा, ता. हवेली), जालिंदर बापू गायकवाड (वय 18, रा. दिवे , ता. पुरंदर) आणि नवनाथ रघुनाथ खिलारे (वय 39, रा. दिवे, ता. पुरंदर) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. रूपाली सोमेश्वर मोडक (वय 39), सानिका सोमेश्वर मोडक (वय 11, दोघी रा. वडकी पिंपळमळा, ता. हवेली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रकचालक अब्दुल गुलाम रसूल शेख (रा. चिंचोली, ता. मोहोळ) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवडहून हडपसरच्या दिशेने येत असलेल्या भरधाव ट्रकने सासवडच्या दिशेने निघालेल्या गायकवाड व खिलारे यांच्या दुचाकीला वडकी येथील ग्रेटिंग हॉटेलसमोर जोराची धडक दिली. त्यानंतर हा ट्रक बाजूला जाऊन मोडक यांच्या दुचाकीला धडकला. यामध्ये खिलारे व गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मोडक, त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाले. त्यांना तत्काळ नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मोडक यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.