Pune: वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्व बेडस कोरोना रुग्णांना उपलब्ध करून द्या – बापट

एखाद्या रुग्णालयाची क्षमता 650 बेडसची असता फक्त 150 कोरोना रुग्ण दाखल करून घेता येतात.

एमपीसी न्यूज – वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील सर्व बेडस कोरोनाग्रस्त रुग्णांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे दिल्ली येथे भेट घेऊन केली. 

जनरल वाॅर्ड व्यतिरिक्त वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात गायनाकॉलॉजी, हृदय रोग, अस्थिरोग इ. शाखांसाठी काही वॉर्ड राखून ठेवलेले असून त्यामध्ये तज्ञ डॉक्टर्स व अद्ययावत सुविधाही उपलब्ध असतात. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार अशा खाटा राखून ठेवणे बंधनकारक असते. परंतु, महाविद्यालयांना मान्यता टिकवून ठेवण्यासाठी व कौन्सिलच्या नियमांचे कठोरपणे पालन करण्यासाठी बेडस् रिकामे ठेवावे लागतात.

महाविद्यालयातील रुग्णालयात बेड्स उपलब्ध असूनही केवळ मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता रद्द होईल या भीतीने रुग्णालय रुग्णांना प्रवेश नाकारतात. एखाद्या रुग्णालयाची क्षमता 650 बेडसची असता फक्त 150 कोरोना रुग्ण दाखल करून घेता येतात. तसेच, टीबी किंवा श्वसनाच्या रुग्णांसाठी खाटा राखून ठेवाव्या लागतात. त्यामुळे सुमारे 480 खाटा रिकाम्या असतात.

केंद्राने हे नियम शिथिल करून त्या कोरोना ग्रस्तांना उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी हंगामी स्वरूपाचा आदेश काढावा या मागणीला डॉ. हर्षवर्धन यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.