Pune : दारूच्या नशेत मामाने केली भाच्याची हत्या

एमपीसी न्यूज- दारूच्या नशेत मामानेच भाच्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडला.

संपत माणिकराव उडदे (वय 35) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संपत उडदे हा मध्यप्रदेशातील असून तो मामासोबत हडपसर परिसरात राहत होता. दोघेही मजुरीचे काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री दोघेही दारू पीत बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि मामाने डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला आहे. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.