Pune MHADA: पुणे मंडळ म्हाडाच्या 5211 घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ

एमपीसी न्यूज : पुणे मंडळ म्हाडाच्या 5211 घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (Pune MHADA) आज शुभारंभ करण्यात आला.

विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत.

PCMC Cancer hospital: महापालिका थेरगावात कॅन्सर रुग्णालय सुरू करणार

पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतौल 278 सदनिका,(Pune MHADA) प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या 2845 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2088 सदनिका अशा एकूण 5211 सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.