Pune : खंडणीच्या गुन्हयात मंगलदास बांदल गजांआड

एमपीसी न्यूज : सराफा व्यावसायिकाकडे 50 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना आज ( शनिवारी) अटक करण्यात आली. या प्रकरणात बांदल यांचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पुण्याच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना गजांआड केले.

या प्रकरणात याआधी बांदल यांच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बांदल यांना खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात बोलावले होते. तेथे केलेली चौकशी आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बांदल यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पुण्यातील सदाशिव पेठेतील सराफा व्यावसायिकाला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत पिस्तुलाच्या धाकाने 50 कोटीची खंडणी मागतल्याचा बांदल यांच्यावर आरोप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.