Pune : विधान परिषदेसाठी पुण्यातून अनेकजण इच्छुक

Many from Pune are interested in the Legislative Council

दीपक मानकर, सुभाष जगताप, रमेश बागवे, सदानंद शेट्टी यांची नावे चर्चेत

एमपीसी न्यूज – राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्यासाठी पुणे शहरातून अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, जेष्ठ नगरसेवक आबा बागुल, भाजपकडून सदानंद शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सदानंद शेट्टी यांनी ऐन निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले.

या निवडणुकीत रमेश बागवे यांचा केवळ 5 हजार मतांनी पराभव झाला.

विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून अद्यापही मातंग समाजाला संधी मिळाली नाही. त्यामुळे आमच्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी सुभाष जगताप, रमेश बागवे, हनुमंत साठे यांनी केली आहे.

आबा बागुल यांनाही सातत्याने विधानसभा निवडणुकीत डावलले जाते. त्यामुळे यावेळी काँग्रेसने विचार करावा, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनीही सध्या समाजकार्याचा धडाकाच लावला आहे. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन आहे.

या कालावधीत गोरगरिबांची जेवणाची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांनी रोज 5 हजार नागरिकांना अजित भोजन योजना सुरू केली आहे.

मानकर यांचे सामाजिक कार्य वर्षानुवर्षे नित्यनियमाने सुरूच आहेत. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. नंतर ही प्रक्रिया थांबली.

त्यानंतर आता आमदारकीची संधी मिळणार का, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

दरम्यान, शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी होत चालली आहे. 2019 च्या निवडणुकीत दोन आमदारांचा पराभव झाला.

त्यामुळे पक्षाला ताकद देण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे यांना आमदारकीची संधी मिळणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.