Pune : कसबा पेठ , सोमवार पेठेत अनेक समस्या – सुजाता शेट्टी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणूक न झाल्याने टोलवाटोलवी (Pune)सुरू आहे. कसबा पेठ – सोमवार पेठ – मंगळवार पेठ या भागांत पाणी, ड्रेनेज रस्त्यांची समस्या निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांनी आज दिली.

वरील समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे आम्ही रोज पाठपुरावा करीत आहोत. समस्या सोडविण्यासाठी बजेट नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मागील 2 वर्षांपासून पुणे महापालिकेत प्रशासक राज आहे.

त्याचा फटका नगरसेवकांना बसला आहे. आपल्या समस्या(Pune) सोडविण्यासाठी नागरिक जनसंपर्क कार्यालयात येतात. त्यांना पुणे महापालिका प्रशासनाच्या टोलवाटोलवीची माहिती देण्यात येत आहे.

Pune : शिवराज्याभिषेकासह रायगडाची कथा ऐकण्याची पुणेकरांसाठी संधी

पुणे महापालिका निवडणूक न झाल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिला नाही. विशेषतः माजी नगरसेवक सध्या कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. महापालिका निवडणूक कधी होणार, ते सांगता येत नसल्याचेही सुजाता शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकी नंतरच पुणे महापालिका निवडणूक होणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.