Pune: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पुण्यातील अनेकांना डावलले, नाराजीचे सूर

Pune: Many were neglected in the BJP's state executive, parties punekars worker were upset या जम्बो कार्यकारिणीत आपली निवड व्हावी, यासाठी पुण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. पण, त्यांच्या पदरी निराशाच पडली.

एमपीसी न्यूज- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या कार्यकारिणीत पुण्यातील अनेकांना डावलल्यामुळे नाराजी निर्माण झाली आहे. शहरात 6 आमदार आणि 1 खासदार, महापालिकेत तब्बल 98 नगरसेवक निवडून दिलेल्या पुणेकरांना फारसे स्थान मिळाले नसल्याची खमंग चर्चा सुरू आहे.

या जम्बो कार्यकारिणीत आपली निवड व्हावी, यासाठी पुण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. पण, त्यांच्या पदरी निराशाच पडली. प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये शून्य, मोर्चा अध्यक्षांमध्ये एक, सेलच्या संयोजकपदी तीन तर, तब्बल 68 जणांच्या कार्यकारिणीत चार अशी मोजकीच पदे पुणेकरांच्या वाट्याला आली आहेत.

विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्त्यांना मोठी आशा होती. पण, अपेक्षित निवड झालीच नाही.

वर्ष 2019 मध्ये भाजपचे गिरीश बापट यांनी तब्बल सव्वातीन लाख मतांनी लोकसभेत विजय मिळविला. त्यापाठोपाठ विधानसभेच्या आठपैकी सहा जागांवर भाजपचे आमदार विजयी झाले आहेत.

एवढी भलीमोठी ताकद मिळाली असताना भाजपच्या नव्या कार्यकारिणीत पुण्यातील एकाही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळालेले नाही. तर, जिल्ह्यातही आमदार राहुल कुल, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, दिगंबर भेगडे, भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष संगीताराजे निंबाळकर यांनाही अपेक्षित स्थान मिळाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86bc44173f85393a',t:'MTcxMTY3NzYyNS42NTkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();