Pune : भारतातील सामाजिक उद्योजकतेचे उगवते प्रवाह पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – ‘टाटा ट्रस्ट्स’ चा सामाजिक पुढाकार असलेल्या विकासान्वेष फाउंडेशन संस्थेद्वारे  निर्मित ‘भारतातील सामाजिक उद्योजकतेचे उगवते प्रवाह ‘ पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील ‘लाईव्हलीहुड्स  इंडिया समिट’ या राष्ट्रीय परिषदेत झाले. या पुस्तकात भारतातील उगवत्या सामाजिक उद्योजकतेचा वेध घेण्यात आला आहे.

ज्योत्स्ना सिंग (माजी सहसचिव, मिनी स्केल डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रुनरशिप), प्रवेश वर्मा (कामतांन फार्म टेक), विजय प्रताप सिंग (सह संस्थापक, एकगाव संस्था ), डॉ .सी. शंभू प्रसाद (इर्मा संस्था ), डॉ. अजित कानिटकर (वरिष्ठ सल्लागार, विकासान्वेष फाउंडेशन) यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.

विकासान्वेष फाउंडेशनचे मुख्य कार्यालय बावधन, पुण्यात असून येथील युवा संशोधकांनी भारतभर फिरून सामाजिक उद्योजकतेच्या नव्या प्रवाहांचा अभ्यास केला आणि आपली निरीक्षणे या पुस्तकात एकत्र केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.