Pune: मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेत मार्केट डे 

एमपीसी न्यूज – टिळक रोडवरील डेक्कन एजुकेशन सोसायटीची  (Pune)मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेत मार्केट डे (बाजारहाट दिन) मोठय़ा उत्साहात साजरा झाला. शाळा समितीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ठकार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
शाळेतील मुलेच विक्रेते आणि ग्राहक होते. गाजर, मटार, मेथी, पालक, कोथिंबीर, कांदे, बटाटे इत्यादी भाज्या विक्रीसाठी होत्या. कॅशलेस व्यवहारासाठी शेजारीच एटीएम मशीनची प्रतिकृती तयार होती. मुले भाजी विक्रेत्याच्या वेशभूषेत आली होती.

Pune : ‘नमो चषक’ स्पर्धांमुळे विविध क्रीडा प्रकारांना व स्थानिक खेळाडूंना वाव – चंद्रकांत पाटील

बरोबर भाजी खरेदी करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशवी आणली होती.
आपल्याकडून भाजी घ्यावी म्हणून आरोळ्या देत होती. आपल्या आवडीची भाजी विकत घेण्यास मुलांना आनंद वाटत होता. मुलांना प्रत्यक्ष भाज्यांची ओळख व्हावी, खरेदी-विक्री व्यवहार माहिती व्हावी, या उद्देशाने मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम पार पडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.