Pune : व्यसनी पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या ; पतीला अटक

एमपीसी न्यूज – व्यसनी पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.

सोनल बाळासाहेब रोडे (वय 19, रा.आंबेगाव पठार) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बाळासाहेब रोडे याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील चौरंगनाथ धुमाळ (वय 47, रा. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धुमाळ यांची मुलगी सोनल हिचा बाळासाहेब याच्याशी मार्च 2018 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या लग्नाच्या काही दिवसानंतर सोनलच्या पतीने तिला दारू पिऊन मारहाण करण्यास सुरवात केली. वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक छळ करीत होता. या सर्व गोष्टींना कंटाळून सोनलने अखेर घराच्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.एम.खानविलकर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.