Pune : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी मार्शल लीलाकर ससून रुग्णालयातून पळाला

एमपीसी न्यूज –   शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून ( Pune) रुग्णालयातून  पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लीलाकरला पुणे पोलिसांंनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ याला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती.

आज पहाटेच्या सुमारास लीलाकरने छातीत दुखत असल्याचा बाहाणा केला. त्यामुळे  येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Chakan : चाकण शहराचा पुढील पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न मिटणार – शिवाजीराव आढळराव पाटील

काही दिवसांपूर्वी  शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लीलाकर याला अटक केली होती.

काहीच महिन्यांपूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यानंतर आता शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावणारा आरोपी लीलाकर याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याला पकडणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.