Pune : मार्व्हल्स, चित्ता, गनर्स, ऑलस्टार ‘सेव्हन अ साईड सिटी प्रिमियर लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज : निरागस नाइट्स, मॅट्रिक मार्व्हल्स, कॉन्स्टेलेशन चीता, जीएनएस गनर्स, सक्सेस स्ट्रायकर्स आणि आदित्य ऑलस्टार्स (Pune) संघांनी येथे सुरु असलेल्या पाचव्या पर्वातील ‘सेव्हन अ साईड सिटी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने सिटी एफसी संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सक्सेस स्ट्रायकर्स संघाने 13 वर्षांखालील विभागात अपराजित राहताना आदित्या ऑलस्टार्स संघासह अंतिम फेरी निश्चित केली.

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी, सक्सेस स्ट्रायकर्सला ज्योती जग्वार्सविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.  ज्योती जग्वार्सने अंश गिरमेने चौथ्या मिनिटाला केलेल्या गोलने आघाडी घेतली. त्यानंतर मोहनीश आमोडेने 8 व्या मिनिटाला गोल करून स्ट्रायकर्सला बरोबरी साधून (Pune) दिली. अन्य एका सामन्यात स्ट्रायकर्सने डायमंड डॅगर्सला 3-0 असे हरवले. सोहम चौधरीने दोन, तर मोहनीश आमोदेने एक गोल केला.

Bhosari News : पगारापेक्षा जास्त पैशांची मागणी करत मालकाला दिली जिवे मारण्याची धमकी

आदित्य ऑलस्टार्स संघाने आयुष कुराकुरीच्या एक मात्र गोलच्या जोरावर ज्योती जग्वार्सचा 1-0 असा पराभव केला. स्पर्धेत 9 वर्षांखालील गटात निरागस नाईट्स आणि मॅट्रिक मार्व्हल्स, तर 11 वर्षांखालील गटात कॉन्स्टेलेशन चीता आणि जीएनएस गनर्स यांच्यात अंतिम लढत होईल.

निकाल – Pune

9 वर्षांखालील : डायमंड ड्रॅगर्स : 0 बरोबरी वि. प्रबल पँथर्स 0, मॅट्रिक मार्व्हल्स : 1 (माधवन 9 वे मिनिट) वि.वि. निरागस नाइट्स : 0 डायमंड डॅगर्स 0 बरोबरी वि.  मॅट्रिक मार्व्हल्स 0, निरागस नाइट्स : 5 (युझरसीफ शेख 4, 11, 18, 22 वे मिनिट, अहान वानखेडे 20 वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स : 0; निरागस नाइट्स : 1 (आरव अग्रवाल 7 वे मिनिट) वि.वि. डायमंड डॅगर्स : 0, मॅट्रिक मार्व्हल्स : 2 (अंश धकाते 15, 18 वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स : 0

11 वर्षांखालील : निरागस नाइट्स 0 बरोबरी वि. जीएनएस गनर्स 0, गोल्डन गार्डियन्स : 1 (रेवंथ मोडक 2रे मिनिट) बरोबरी वि. कॉन्स्टलेशन चिता : 1 (विहान जरांडे 17 वे मिनिट); कॉन्स्टलेशन चित्ता : 2 (विहान जरांडे 15 वे मिनिट,  निर्वाण वानखेडे 21 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : 1 (सोहम जाधव 12 वे मिनिट); निरागस नाइट्स 0 बरोबरी वि. गोल्डन गार्डियन्स 0, जीएनएस गनर्स : 2 (सोहम जाधव 9 वे मिनिट, वेद ब्रम्हे 1वे मिनिट) वि.वि. गोल्डन गार्डियन्स 0. कॉन्स्टलेशन चिता 1 (विहान जरांडे 11 वे मिनिट) वि.वि. निरागस नाईट्स : 0

13 वर्षांखालील : सक्सेस स्ट्रायकर्स : 1 (मोहनिश आमोडे 8 वे मिनिट) बरोबरी वि. ज्योती जग्वार्स 1 (अंश गिरमे 4थे मिनिट); डायमंड डॅगर्स 1 (हर्ष अग्रवाल 11 वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स: 0, सक्सेस स्ट्रायकर्स : 3 (मोहनिश आमोडे 3रे मिनिट, सोहम चौधरी 15, 22वे मिनिट) वि.वि.  डायमंड ड्रॅगर्स : 0 आदित्य ऑलस्टार्स : 1 (आयुष कुराकुरी 12 वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स : 0, सक्सेस स्ट्रायकर्स 0 बरोबरी वि. आदित्य ऑलस्टार्स 0 ज्योती जग्वार्स 1 (ओम भडके 9 वे मिनिट) वि.वि. डायमंड डॅगर्स: 1 (आदित्य भालेराव 15 वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.