Pune : मास्क, सॅनेटायझर, हँडवॅाशच्या वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्याची माहिती द्या -सीमा बैस

एमपीसी न्यूज – सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तूंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे. अशा जादा दराच्या विक्री बाबत तक्रार असल्यास उपनियंत्रक वैधमापनशास्त्र पुणे विभाग पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पाच जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये संपर्क साधावा,असे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा सु. बैस यांनी केले आहे.

संपर्क साधावयाची कार्यालये पुढीलप्रमाणे- #उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग, पुणे- दुरध्वनी क्र.020-26683176,

#सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे जिल्हा- दुरध्वनी क्र. 020-26137114,

#सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सातारा जिल्हा- दुरध्वनी क्र. 02162-232143,

#सहायक नियंत्रक, वैध मापनशास्त्र, सांगली जिल्हा- दुरध्वनी क्र. 0233-2600053,

#सहायक नियंत्रक, वैध मापनशास्त्र, कोल्हापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0231-2542549,

#सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सोलापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0217-2601949 अशी आहेत.

संबंधित बातम्या वाचा –

Pimpri: शहरात कोरोनाचे तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’! (Video)

Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची प्रकृती स्थिर

Pimpri: ‘परदेशातून आला म्हणजे कोरोनाचा रोगी होत नाही, सोसायटीतील प्रवेशापासून रोखू नका’; महापालिकेचे आवाहन

Pimpri: चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी अन् संपल्यानंतर ‘थिएटर’ निर्जंतुकीकरण करा, महापालिकेच्या सूचना

Pune: कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, दगावण्याची शक्यता अत्यल्प- आयएमए

New Delhi: कोरोना ही विश्वव्यापी साथ, जागितक आरोग्य संघटनेची घोषणा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.