Pune : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मांडले ‘गणिती’ समीकरण

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अनोखे गणिती समीकरण मांडले आहे. त्यामाध्यमातून पोलिसांनी कोरोनाला निरोगी शरीरातून वजा करण्याचा फॉर्म्युला मांडला आहे. हा फॉर्म्युला पोलिसांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.

घरी रहा + हात धुवा = निरोगी शरीर – कोरोना

जमावबंदी, संचारबंदी, प्रतिबंधात्मक आदेश काढणे, त्याची अंमलबजावणी करणे याव्यतिरिक्त प्रत्यक्ष समाजात जाऊन नागरिकांशी सुसंवाद ठेवण्याचे काम देखील पोलीस करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट पसरला आहे.

तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी रेंगाळतात. यामुळे कोरोनाचा घोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना निरोगी आरोग्याचे समीकरण सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.