Pune: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सापडले सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

कसबा-विश्रामबाग वाडा व ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतही लक्षणीय संख्या

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे 69 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 33 कोरोनाबाधित रुग्ण तर ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हा सर्व भाग ‘सील’ करण्यात आला असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 

त्या खालोखाल हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 21 कोरोनाबाधित रुग्ण, धनकवडी- शंकरनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 19 कोरोनाबाधित रुग्ण, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 16 कोरोनाबाधित रुग्ण, शिवाजीनगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 11 कोरोनोबाधित रुग्ण, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 10 कोरोनाबाधित रुग्ण तसेच वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आठ कोरोनाबाधित रुग्ण, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाच कोरोनाबाधित रुग्ण, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तीन कोरोनाबाधित रुग्ण, नगर रोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तीन कोरोनाबाधित रुग्ण, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय व कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या व्यतिरिक्त महापालिका हद्दीबाहेरील 12 कोरोनाबाधित रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या पातळीवर कोरोना प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यासाठी पुणे महापालिका व  पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येचे विभागनिहाय विश्लेषण करणारा नकाशा जारी करण्यात येत आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वांनाच विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.