Pune : पुणे कमाल 40.7 अंश सेल्सियस

पुढील आठ दिवस कमाल तापमान 40 ते 39 अंश सेल्सियस राहणार

एमपीसी न्यूज- पुणे शहरात आज कमाल 40.7 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. तर लोहगावमध्ये 41.1 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले. सरासरी तापमानापेक्षा 3 डिग्री सेल्सियसने कमी आहे. पुढील आठ दिवसांत कडक उन्हापासून पुणेकरांची सुटका होणार नसून कमाल तापमान 40 ते 39 अंश सेल्सियस राहणार असल्याचा पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा जाणवत असून, प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पुणेकरांना पंखा, कूलर, एसी याचा आधार घ्यावा लागत आहे. कमाल तापमानाने चाळीशी ओलांडलेली असून पुढील आठ दिवसांत कमाल तापमान 40 ते 39 अंश सेल्सियस राहणार असल्याचा पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. लोहगाव केंद्रामध्ये पुण्यापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, शहरासह राज्याच्या सर्वच भागांत उष्णता वाढली असून, विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाऱ्याने चाळिशीचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील सर्वाधिक 46.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी येथे झाली तर किमान तापमानाची नोंद नाशिक येथे 20.6 अंश नोंदविण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.