BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गुडमॉर्निंग मुंबई शहर संघाचा न्यू हिंदविजय चिपळूण संघावर थरारक विजय

पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पुरूष विभागात ब्रम्हा विष्णू महेश, नवभारत संघ, उत्कर्ष व महिला विभागात राजमाता जिजाऊ, आकांक्षा कला क्रीडा, सुवर्णयुग, धर्मवीर बालेवाडी, जय हनुमान बाचणी, शिव ओम स्पोर्टस्, राजा शिवछत्रपती, स्वास्तिक, शिवशक्ती मुंबई, एमएच स्पोर्टस्‌, जागृती प्रतिष्ठान, स्वराज्य संघ, क्रीडा प्रबोधिनी नासिक, द्रोणा स्पोर्टस्‌, महेशदादा स्पोर्टस्‌ व अनिकेत स्पोर्टस्‌ या संघानी आपआपल्या गटातून बाद फेरीत प्रवेश केला.

पुणे विमाननगर येथील सिंम्बॉयसिस क्रीडांगणावर सुरू असलेल्या पुणे महानगरपालिका आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने पुणे महापौर चषक कबड्डीस्पर्धेचे तिसऱ्या दिवशी पुरूष विभागात गुडमॉर्निंग मुंबई शहर संघाने न्यू हिंदविजय चिपळूण संघावर 34-16 अशी मात करीत विजय मिळविला.

मध्यंतराला गुडमॉर्निंग संघाने 20-9अशी चांगली आघाडी घेतली होती. या आघाडीत अमित जाधव याने केलेल्या चढाया व निलेश ठाकुर याने घेतलेल्या पकडीचा मोलाचा वाटा होता. न्यू हिंदविजय संघाच्या निलेश शिंदे व सौरभ नाडकर यांनी चांगला प्रतिकार केला. पुरूषांच्या दुसऱ्या सामन्यात नुमवि संघाने स्वास्तिक संघावर 40-34 अशी मात केली. मध्यंतराला नुमवि संघ 11-19 असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर मयूर शेरवे यांने आक्रमक खेळ करीत चांगल्या चढाया केल्या व अतुल जगताप याने घेतलेल्या उत्कृष्ट पकडी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. स्वस्तिक संघाच्या सुयोग राजापूरकर याने एकाकी लढत दिली.

महिला विभागात जागृती प्रतिष्ठानसंघाने वाघेश्वर स्पोर्टस् संघावर 72-38 असा एकतर्फी धुव्वा उडवित विजय मिळविला. मध्यंतराला जागृती प्रतिष्ठान संघाकडे 34-14 अशी चांगली आघाडी होती. जागृती प्रतिष्ठानच्या सायली हमनघर व अदिती मोरे यांनी चौफेर चढाया करीत वाघेश्वर संघाचा बचाव खिळखिळा केला. त्यांना अंजली मुळेने घेतलेल्या पकडींची चांगली साथ लाभली. वाघेश्वर स्पोर्टस् संघाच्या आरती म्हस्के व आश्विनी हिंगे यांनी चांगला खेळ करीत शर्तीची लढत दिली.

बलाढ्य शिवशक्ती संघाने एमएच स्पोर्टस् संघावर 45-21 अशी मात करीत बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला शिवशक्ती संघाकडे 21-17 अशी आघाडी होती. शिवशक्ती संघाच्या राष्ट्रीय खेळाडू सोनाली शिंगटे व अपेक्षा टाकळे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर एमएच स्पोर्टस्‌ला नमविले. एमएच स्पोर्टस्‌च्या प्रतिक्षा कऱ्हेकर व चैत्राली कारके यांनी चांगला प्रतिकार केला.

शाहू सडोली वि.वि. बदामी हौद( 40-23), नव भारत शिरोली कोल्हापूर वि.वि. ब्रम्हा विष्णू महेश (35-21), एनटीपीसीएल वि.वि. छावा संघ (41-20), नुमववि वि.वि. स्वास्तिक उपनगर(40-34), अनिकेत खेड वि.वि. रुक्मिणी स्पोर्टस्‌ सोलापूर (37-28), स्वराज्य स्पोर्टस्‌ वि.वि. दसपटी स्पोर्टस्‌ (36-25), महिलांचे इतर झालेले सामने- नासिक प्रबोधिनी वि.वि. द्रोणा स्पोर्टस् (41-28), स्वराज्य स्पोर्टस्‌ वि.वि. श्री साई स्पोर्टस् (34-19), स्वास्तिक स्पोर्टस्‌ वि.वि. श्रमदान प्रतिष्ठान (32- 29).

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.