Pune : महापालिका आवारात बालकामगार प्रथेविरुद्ध महापौर, उपमहापौर, अधिकारी यांनी घेतली शपथ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या मुख्य भवनातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बालकामगार प्रथेविरुद्ध शपथ देण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, अधिकारी आणि कर्मचारी यांनीही बुधवारी शपथ घेतली.

_MPC_DIR_MPU_II

राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत दि. 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत संपूर्ण राज्यात बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिमार्फत किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही व्यक्तिमार्फत त्यांच्या घरगुती किंवा इतर कोणतेही काम करण्यासाठी 14 वर्षांखालील मुलांना नोकरीला ठेवणार नाही  किंवा नोकरीला ठेवण्यास परवानगी देणार नाही, अशी शपथ घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.