Pune : ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर महापौर यांनी ‘पीएमपीएमएल’ बस सेवा केली बंद

एमपीसी न्यूज – वारंवार पाठपुरावा करूनही बंदीचे आदेश न निघाल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट पीएमपीएमएल (PMPML) मुख्यालय गाठले. महापौरांनी अध्यक्षा नयना गुंडे यांना यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. आज संध्याकाळी पाचपासून ‘पीएमपीएमएल’ची बस सेवा बंद राहणार आहे.

केवळ अत्यावश्यक सेवेपुरत्याच बसेस उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा फटका ‘पीएमपीएमएल’ला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

दररोज 1800 बसेस शहराच्या विविध भागात धावत असतात. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने संचारबंदी सारखे वातावरण पुण्यात तयार झाले आहे. सर्वच कार्यालयांना सुट्टी असल्याने रस्त्यांवर स्मशान शांतता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.