Pune : वडारवाडी दुर्घटनेची महापौर, आमदार, आयुक्तांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आग लागून झोपड्या खाक झाल्या. त्याची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे यांनी पाहणी केली.

पुणे महापालिकेर्फे या नागरिकांना योग्य ती मदत देण्यात येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तर, या भागात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी आदित्य माळवे यांनी केली आहे.

यावेळी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संदीप काळे उपस्थित होते. दरम्यान, या आगीत ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम प्रशादनातर्फे सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.