Pune : भाजपकडून तीन आमदारांना ‘नारळ’, कसबा विधानसभा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन विद्यमान आमदारांना ‘नारळ’ दिला. तर, कसबा विधानसभा मतदारसंघात धक्कादायक उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिल्याने खासदार बापट यांचे पंख छाटल्याचे बोलले जात आहे. मुक्ता टिळक यांच्या उमेदवारीने भाजपचे सर्वच नगरसेवक नाराज झाले आहेत.

खासदार बापट यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. बापट यांचा स्नुषा स्वरदा या मतदारसंघात इच्छुक होत्या. स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर, नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने, प्रबळ दावेदार होते. कोथरूड मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातुन माजी मंत्री दिलीप कांबळे तर शिवाजीनगर मतदासंघातून विजय काळे यांना ‘नारळ’ देण्यात आला आहे.

विजय काळे यांच्या विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापते वेळी मुलाला विधानसभेची उमेदवारी देणार असे सांगण्यात आले होते, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.