Pune : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले

Mayor Muralidhar Mohol thwarted the opposition's intentions

एमपीसी न्यूज – कोरोनाचे कारण पुढे करून काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना या विरोधी पक्षांनी आज, बुधवारी सर्वसाधारण सभेत भाजपला कोंडीत पकडण्याची जोरदार खेळी केली. मात्र, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वेळीच सावध होत विरोधकांचे मनसुबे उधळून लावले.

सभागृह नेते धीरज घाटे यांनीही लगेचच सभा तहकूबी मांडली. त्यावर महापौरांनी विरोधी पक्षांना आवाहन केले. सभासद, महापालिका अधिकारी आपण फिल्डवर काम करणारी माणसे आहोत. 400 ते 500 लोकांना आपण दररोज भेटत असतो. आजही या सभागृहात  जवळपास 150 ते 200 माणसे उपस्थित आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात सभा चालविणे बरोबर नाही, अशा शब्दांत महापौरांनी विरोधकांना सुनावले.

मागील दोन महिन्यांपासून सर्वसाधारण सभा तहकूब झाल्याने तब्बल 98 नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार कायम होती. या काळात ही सभा होणे गरजेचे असल्याचेही महापौरांनी निक्षून सांगितले.

त्यामुळे आज सभा सुरू होण्यापूर्वीच आधी सही करायला सर्व पक्षीय नगरसेवकांचे प्राधान्य होते. ‘फिजिकल डिस्टन्स’ ठेवत मास्क लावून, सॅनिटायजरचा वापर करून सभा घेण्यात आली.

सध्या काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना – मनसे हे सर्वच राजकीय पक्ष भाजप विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी आता भाजपही सज्ज झाले आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचे आजच्या सभेच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.