Pune News :  ‘तुमचे नगरसेवक 10 अन् दावा करताय महापौर पदाचा’, महापौरांचा संजय राऊत यांना टोला 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना आपलाच महापौर होणार अशी स्वप्न पडायला लागली आहे. त्यामुळेच की काय मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचे पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहराचे दौरे वाढले आहेत. दरम्यान, महापौर आमचाच होणार अशी वक्तव्य या नेत्यांकडून केली जात आहेत.

खासदार संजय राऊत हे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांना चिमटा काढला आहे.

महापौरांनी यासंदर्भात एक ट्विट केलं असून त्यामध्ये ते म्हणाले, ‘अहो संजय राऊतजी, पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी, महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील, याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा! तरीही आपल्याला शुभेच्छा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.