Pune : महापौर साहेब, माझ्यावर ‘लाव रे, तो व्हिडिओ’ची वेळ आणू नका; पाणी प्रश्नावर मनसेच्या गटनेत्यांचा इशारा

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्ताधारी भाजप विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे, तो व्हिडिओ’च्या माध्यमातून भाजपला लक्ष केल्याचे पहावयास मिळाले. आता हीच भाषा पुणे महापालिकेत मनसेचे दोनच नगरसेवक असून गटनेते वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रभागातील पाणी प्रश्न मांडताना, माझ्याकडे पाणी प्रश्नावर स्थानिक आमदार अधिकाऱ्यांना धमकावत आहे. याबाबतचे धक्कादायक ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. तर, महापौर साहेब माझ्यावर ‘लाव रे, तो व्हिडिओ’ची वेळ आणू नका. योग्य वेळी पुढे आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

पुणे शहरातील नागरिकांना मागील काही दिवसापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नगरसेवकाकडे पाणी टंचाईबाबत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नगरसेवक हैराण झाले आहे. त्यात आज पुणे महापालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी शहरातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या पाणी नियोजनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

  • तसेच सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. यावेळी अनेक नगरसेवकांनी भाषणे केली. मात्र, यामध्ये महापालिकेच्या सभागृहात मनसेचे केवळ दोनच नगरसेवक असून गटनेते वसंत मोरे यांनी शहराच्या प्रश्नावर भाषण करताना, माझ्या प्रभागात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळाले पाहिजे. मात्र, स्थानिक आमदार यात राजकारण आणत असून अधिकारी वर्गाला धमकावत आहे. याबाबतचे ऑडिओ आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तुम्ही सर्वांनी ऐकल्यावर धक्काच बसेल. त्यामुळे माझ्यावर ‘लाव रे, तो व्हिडिओ’ म्हणायचे वेळ आणू नका, असा इशारा महापौर आणि प्रशासनाला त्यांनी दिला.

वसंत मोरे यांच्या या विधानामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे, तो व्हिडिओ’ म्हणत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला होता. आता त्यांच्याच पक्षाचा नगरसेवक देखील ‘लाव रे, तो व्हिडिओ’ म्हणायची वेळ आणू नका, असे विधान केल्याने राज ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांना यावेळी आठवण झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.