Pune: पुण्यात स्वॅब टेस्टसाठी महापौर निधी वापरणार

Pune: Mayor's fund will be used for swab test in Pune शहरातील रुग्ण संख्या वाढत असली तरी आणखी मोठ्याप्रमाणात चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरु आहेत.

एमपीसी न्यूज- कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची स्वॅब तपासणी होणे आवश्यक असून हीच गरज ओळखून पुणे महापालिका आता खासगी लॅब चालकांसोबत करार करून दररोज किमान पाचशे ते एक हजार चाचण्या करणार आहे. या संदर्भात लॅबच्या प्रतिनिधींशी बैठकही घेतली असून याचा खर्च महापौर निधी आणि इतर निधीतून केला जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहरातील स्वॅब टेस्ट संख्या वाढावी यासाठी महापौर मोहोळ स्वतः सुरुवातीपासूनच आग्रही असून या संदर्भातील मागणीही राज्य सरकरकडे प्रलंबित आहे. मात्र कोरोना संसर्गाची परिस्थिती पूर्णतः हातात राहावी, यासाठी महापौर मोहोळ यांनी १९ मे रोजी मान्यताप्राप्त लॅब चालकांच्या प्रतिनिधींची बैठक महापौर बंगला येथे घेतली होती.

राज्य सरकारने कोविड चाचणीसाठी २२०० रुपयांचा दर निश्चित केलेला आहे. मात्र यापेक्षाही कमी दरात ही चाचणी करुन घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी महापालिकेने खासगी लॅबकडून दरही मागविले आहेत.

महापौर मोहोळ म्हणाले, शहरातील रुग्ण संख्या वाढत असली तरी आणखी मोठ्याप्रमाणात चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आणखी जास्त वेळ न दवडता आपण खासगी लॅब चालकांकडून स्वॅब टेस्ट करून घेत आहोत.

यासाठी लागणारा खर्च महापौर निधी, नगरसेवकांच्या स-यादीतून आणि सीएसआरमधून येणाऱ्या रकमेतून देणार आहोत. ही प्रक्रिया कमीत कमी कालावधीत करण्याचा प्रयत्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.