Pune : ‘एमसीई सोसायटी’ची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन मिरवणूक रद्द

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

मात्र, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतील.सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून सकाळी 9 वाजता संस्थेच्या असेम्ब्ली हॉलमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पीए इनामदार, संस्थेचे सचिव डॉ.लतिफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दरवर्षी एमसीई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. दहा हजार विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.