Pune: मेडी – आयकॉन पुरस्कार सोहळा आणि महिला डॉक्टरांची मेडिक्वीन सौंदर्यवती स्पर्धा 25 फेब्रुवारीला पुण्यात रंगणार 

एमपीसी न्यूज – वैद्यकिय क्षेत्रातील महिला डॉक्टरांच्या(Pune) सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, महिलांमधील कर्करोग व एकंदरीत आरोग्य जनजागृतीसाठी ‘मेडीक्वीन क्लब ग्लोबल’ या संस्थेकडून “मेडि आयकॉन अवॉर्ड 2024” व ‘मेडिक्वीन सौंदर्यवती स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
महिला डॉक्टरांचा आत्मसन्मान उंचावणारा हा सोहळा (Pune)रविवारी दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी बालेवाडीतील हॉटेल ऑर्किड येथे सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे. स्पर्धा विजेत्यांना अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे, अशी माहिती मेडिक्वीनच्या संस्थापिका डॉ. प्रेरणा बेरी यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मेडीक्वीनच्या समन्वयक डॉ. प्राजक्ता शहा,  कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रेश्मा पुराणिक, सामाजिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अमृता बऱ्हाटे उपस्थित होत्या.
संस्थेच्या उद्देशाबाबत अधिक माहिती देताना डॉ. प्रेरणा बेरी म्हणाल्या की, मेडीक्वीन क्लब ग्लोबल ही संस्था महिलांच्या आरोग्यासाठी गेली पाच वर्ष काम करत आहे. महिला आरोग्य हे अजूनही खूप दुर्लक्षित आहे.

Chinchwad : गियर उत्पादन क्षेत्रातील 75 कंपन्यांच्या प्रदर्शनास ऑटो क्लस्टरमध्ये सुरुवात

सर्व त्यामुळे सर्वपॅथी मधील महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा विचार होता. आणि या उद्देशातून मेडिक्विनच काम सुरू झालं. ड्रीम, अचिव्ह, इन्स्पायर हे मेडिक्विंस ब्रीदवाक्य आहे. मेडिक्विनचे महिला आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी महिलांना प्रवृत्त करणे आणि महिला डॉक्टरांना जे महिला आरोग्यासाठी काम करतात त्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्या कामाबद्दल सन्मान करणे हा उद्देश आहे. विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला डॉक्टर व प्रथितयश डॉक्टर या कार्यकामासाठी उपस्थित असतील.

तसेच निरामया हा मेडिक्विनचा उद्देश आहे. निरामया म्हणजेच प्रत्येक स्त्री आरोग्यपूर्ण शारीरिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व स्तरांवर सशक्तिकरण करणे हा मेडिक्विन चा उद्देश आहे. यामध्ये वर्कशॉप, अवेअरनेस लेक्चर्स, मासिक पाळी, कॅन्सर, वंद्यत्व, मानासिक विचार, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्वचा व केसांचे विक वर, आहार, व्यायाम, फिटनेस, आर्थिक साक्षरता फायनान्शिअल फिट नेस अशा अनेक गोष्टींचा समावेश निरामय या प्रोग्राम मध्ये केला आहे. आणि यासाठी आम्हाला ऑक्सीरीज कंपनी म्हणजे पुनीत बालन यांनी अगदी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, असेही डॉ. बेरी यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्राजक्ता शाह म्हणाल्या की, मेडिक्विनची इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. मेडिक्विन ही महिला डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारे एकमेव संस्था अशी त्यामध्ये नोंद झालेली आहे. सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्य करतात आणि अशा महिला डॉक्टरांचा सन्मान होणं, त्यांना प्रोत्साहन मिळणं खूप महत्वाचा आहे. याच उद्देशातून मेडी आयकॉन अवॉर्ड ची सुरुवात झाली.याआधी अशा महाराष्ट्रातील 27 महिला डॉक्टरांचा मेडिक्विंन राज्यपाल भगतसिंगजी कोशियारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान केला होता.
डॉ. अमृता म्हणाल्या की, सध्या मेडीक्वीन संस्थेबरोबर महिला आरोग्याबाबत अनेक महिला डॉक्टर कार्यरत आहेत, आणि हे काम अजून व्यापक करण्यासाठी मी सर्व महिला डॉक्टरांना, सर्व पॅथीच्या महिला डॉक्टरांना आवाहन करते की त्यांनी मेडिक्विन या प्लॅटफॉर्मवर एकत्र या. आम्ही जे काम करतोय त्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या आरोग्याबाबत जागरूक व्हा. आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत.
डॉ. रेश्मा पुराणिक म्हणाल्या की, मेडिक्विन संस्था डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला आरोग्य आणि कॅन्सर जनजागृती या कार्यात अग्रेसर असते. आज महिलांमध्ये कँसरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिलांमध्ये जागृती करण्यासाठी आपण डॉक्टर महिला पुढाकार घेत आहोत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.