Pune: प्रसारमाध्यमातील पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच द्या -सुशांत भिसे यांची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या या संकट काळात पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोनाबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व प्रसारमाध्यमातील पत्रकारांना 50 लाखाचा विमा कवच देण्याची मागणी सामर्थ्य प्रबोधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात प्रबोधिनीचे अध्यक्ष भिसे यांनी म्हटले आहे की, कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात देखील कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

पत्रकार आपला जीव धोक्यात घालून कोरोनाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवत आहेत. कोरोना विषाणू बाबत रूग्ण संख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यावर अध्यापर्यंत थेट कोणतेही औषध उपचार उपलब्ध नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये युद्धजन्य संकट निर्माण झालेले असून अशा अडचणी प्रसंगी राज्यातील विविध प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकार,बातमीदारांना 50 लाख रुपयांचे सुरक्षा कवच द्यावे.या संकटाच्या घडीला आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत अनेक प्रसार माध्यमांतील मोठ्या अस्थापना व्यतिरिक्त इतर लहान मोठ्या अस्थापनांमध्ये पत्रकार काम करतात. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या पत्रकारांना कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाही. राज्याच्या आणि समाजाच्या हितासाठी सतत धडपडणाऱ्या या पत्रकारांसाठी 50 लाखाचे विमा कवच देण्याची मागणी भिसे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.