Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू; पुणेकरांचे लक्ष

Pune: Meeting begins in the presence of Sharad Pawar on the background of Corona भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात पवार काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.

एमपीसी न्यूज- मुंबई खालोखाल पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढते आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदर वंदना चव्हाण, गिरीश बापट, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे यावेळी उपस्थित आहेत. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर सुद्धा उपस्थित आहेत.

अधिकाऱ्यांच्यावतीने कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात येत आहे. पुण्यात कोरोनाचे वाढते रुग्ण, मृत्यदर याचा सविस्तर अहवाल ठेवण्यात येत आहे.

पुणे शहरात कोरोनाचे 14 हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. तर, 558 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही बैठक झाल्यानंतर शरद पवार पुणे स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रुमला भेट देणार आहेत.

तर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात पवार काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.

तसेच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी दोन वर्षांपूर्वीच आमच्या सोबत सत्तेत यायला तयार होती, असे खळबळजनक वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात सुद्धा काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

पवार यांचा आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा अनुभव मोठा आहे. कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी ते काय सूचना करणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.