Pune : …तर मेट्रोचे काम होऊ देणार नाही ; पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

एमपीसी न्यूज : महापालिका आणि महामेट्रो यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे कर्वे रस्ता आणि कोथरूड परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मलवाहिन्या आणि पाण्याच्या मुख्य वाहिन्या फुटत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना जर यापुढे  त्रास झाला तर मेट्रोचे काम होऊ देणार नसल्याचा थेट इशारा शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे. 

कर्वे रस्त्यावर सध्या वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे वारंवार जलवाहिन्या आणि मलवाहिन्या फुटत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाला याबाबत कळवल्यास महामेट्रोकडून काम करण्यात येईल, असं सांगण्यात येतं. त्यामुळे कोण कोणते काम करणार याची माहिती नगरसेवकांना मिळत नाही असा आरोप  देखील सुतार यांनी केला आहे. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम केल्यास काम होऊ शकेल अन्यथा मेट्रोला अडचणींना सामोरे जावे लागेल असे देखील पृथ्वीराज सुतार म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.