Pune Metro News: कामगार पुतळा झोपडपट्टीतील झोपडीच्या मालकीचे पुरावे देण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ!

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर न्यायालयाजवळील मेट्रो जंक्शनच्या कामासाठी कामगार पुतळा झोपडपट्टी हटविण्यात येणार आहे. पुनर्वसन प्रक्रियेसाठी झोपडीच्या मालकीचे पुरावे सादर करण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

कामगार पुतळा, राजीव गांधीनगर आणि तोफखाना झोपडपट्टीच्या जागेवर मेट्रोचे जंक्शन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी सर्वप्रथम येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

_MPC_DIR_MPU_II

एसआरएच्यावतीने यापूर्वी झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये 318 झोपडपट्टीधारकांनीच पात्रतेचे निकष पूर्ण केले आहे. यानंतर 29 जानेवारी 2020 ला येथील झोपडपट्टीवासीयांना पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते, परंतु कोणीही पुरावे सादर केले नाहीत.

या तीनही झोपडपट्टीतील नागरिकांना पुरावे सादर करण्याची दिलेली मुदत मंगळवारी संपली. या मोहीमेअंतर्गत आतापर्यंत 75 झोपडपट्टीधारकांनी अर्ज नेले असून त्यापैकी 42 नागरिकांनी पुराव्यासह अर्जही जमा केले आहेत.

लॉकडाउनमुळे काही नागरिकांनी पुराव्यांसाठी आणखी अवधी मागितला आहे. त्यानुसार पुरावे सादर करण्यासाठीची मुदत दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.