Pune : भुयारी मेट्रोचे काम रखडणार ? 

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या नगररस्त्यावरील कामाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने (नॅशनल मॉन्युमेंट ऍथॉरिटीने) परवानगी नाकारली. त्यात आता रेंजहिल्स ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा काही भाग पाताळेश्‍वर तसेच शनिवार वाड्याजवळून जात असल्याने प्राधिकरणाची या दोन्ही ठिकाणसाठी मंजुरी घ्यावी लागणार आहे.

यासाठीचा प्रस्ताव महामेट्रोने राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाला सादर केला आहे. दरम्यान, या दोन्ही पुरातत्त्व स्थळांसाठी परवानगी घेणे आवश्‍यक असतानाही महामेट्रोने त्याकडे दुर्लक्ष करत उशिराने हा प्रस्ताव दाखल केल्याने हे काम रखडण्याची भीती परिसर संस्थेने व्यक्त केली आहे.

आगाखान पॅलेसप्रमाणेच शनिवारवाडा व पाताळेश्‍वर ही दोन्ही राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहेत. त्या स्मारकाच्या 100 मीटर परिसरात काम करण्यास बंदी आहे. तर 100 मीटरपासून पुढे 300 मीटर पर्यंत बांधकाम करायचे झाल्यास रेग्युलेटेड झोन (बांधकाम नियंत्रित क्षेत्र) म्हणून काही नियम व अटींच्या पूर्ततेनुसार, या भागात कामास परवानगी दिली जाते. शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग पूर्णत: भुयारी असला तरी, या मार्गाचा काही भाग पाताळेश्‍वर मंदीर आणि शनिवारवाडयाच्या परिसरात रेग्युलेटेड झोन मध्ये येतो. त्यामुळे काही अटी आणि मागदर्शक तत्वांची पूर्तता करून या भागात काम करता येत असले तरी, त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाची मान्यता लागते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.