Pune Metro news : वनाज ते रामवाडी मेट्रोसाठी मुळामुठा नदीपात्रात लौंचिंग गर्डर उभारण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मेट्रो उभारणीतील महत्त्वाचा टप्पा नुकताच पार पडला. मुळामुठा नदीपात्रात मेट्रो लौंचिंग गर्डर उभारण्यास सुरुवात झाली असून यामुळे पुढील कामाला गती मिळू शकणार आहे.

मेट्रो पुलाचे सेगमेंट बसविण्यासाठी बंड गार्डनजवळील नदीत लौंचिंग गर्डर उभारण्यास सुरुवात झाली आहे. मेट्रोच्या कामातील नदीपात्रातील हे सर्वात अवघड काम आहे. तसेच आरटीओ रोडवर खांबांच्या मध्ये रोड मेडिअन साठी कर्ब स्टोन फिक्सिंगचे काम पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

तर मेट्रो स्थानकांसाठी प्रिकास्ट पिअर आर्म्स बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एकंदरीत पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु वनाज ते रामवाडी मेट्रोचे काम जलदगतीने होण्यास सुरवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.