Pune Metro News : पुणे मेट्रोच्या हलक्या आणि ऊर्जाबचत करणा-या कोचची कोलकात्यात होणार निर्मिती

कोचच्या चाचणीला मे महिन्यात मुहूर्त मिळणार

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या कोचेसची निर्मिती टिटागढ-फिरेमा ही कंपनी करणार असून कंपनीच्या कोलकाता येथील प्लांट मध्ये कोचेसची निर्मिती करण्यात येणार आहे. कोचेस तयार झाल्यानंतर मे अखरेपासून त्याच्या चाचणीला देखील सुरुवात होणार आहे. ही कंपनी पुणे मेट्रोसाठी तीन डब्यांचे 34 ट्रेन संच पुरविणार आहे.

पुणे मेट्रोसाठी बनविण्यात येणाऱ्या ट्रेनच्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण शुक्रवारी (दि. 9) टीटागढ-फिरेमा या कंपनीमध्ये करण्यात आले. यावेळी महामेट्रोचे चेअरमन व शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, महामेट्रोचे संचालक सुनील माथुर आदी उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे वनाझ ते रामवाडी आणि पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गांचे 48 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोचे व्हायाडक्ट, स्टेशन, डेपो, भूमिगत मार्ग यांचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणारे कोचेस अल्युमिनियम या धातूचे असून भारतात वापरण्यात येणा-या इतर मेट्रो डब्यांपैकी सर्वात हलके आहेत. भारतात वापरण्यात येणा-या मेट्रो डब्यांचा ऐक्सल लोड 16.4 टन असतो, परंतु पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणा-या डब्यांची ऐक्सल लोड 15.4 टन इतका असणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

यामुळे मेट्रो चालवण्यासाठी लागणा-या डिझेलची 2 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. या कोचमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून एका डब्यामध्ये 48 लोकांना बसण्याची व्यवस्था असणार आहे. 3 कोच लांबीच्या एका मेट्रोमध्ये साधारणतः 850 लोक प्रवास करू शकतील.

टीटागढ-फिरेमा या कंपनीच्या कोलकाता येथील कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मेट्रो कोच बनवण्याची सुविधा बांधली आहे. या सुविधेचा पाहणी दुर्गाशंकर मिश्रा, डॉ. ब्रिजेश दीक्षित, सुनील माथुर यांनी कोलकाता येथील कारखान्याला भेट दिली. कारखान्यात तयार होणाऱ्या मेट्रो कोचच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पुणे मेट्रोसाठी बनविण्यात येणाऱ्या कोचच्या निर्मितीवर लक्ष्य ठेवण्यासाठी महामेट्रोकडून निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. टीटागढ-फिरेमा कंपनीच्या कोलकाता येथील कंपनीत पुणे मेट्रोच्या कोचची चाचणी मे महिनीच्या अखेरीस सुरू होईल, असे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणारे मेट्रोचे डबे हे अल्युमिनियम पासून बनविण्यात येणार असून वजनाने भारतातील सर्वात हलके मेट्रोचे डबे असणार आहेत. या डब्यांमुळे ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1