Pune Metro News : वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक भागातील मेट्रो सेवा बुधवारपर्यंत अंशतः बंद

एमपीसी न्यूज – सिग्नलिंग प्रणालीच्या चाचण्यांसाठी पुणे मेट्रोची वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक (Pune Metro News) भागातील मेट्रो सेवा 27 आणि 28 डिसेंबर 2022 रोजी अंशतः बंद असणार आहे.

पुणे मेट्रोमधील सिग्नलिंग प्रणालीच्या चाचण्या 27 आणि 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक या मार्गावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर 2022 रोजी वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक या मार्गावरील प्रवासी सेवा दुपारी 2 नंतर सुरु होईल. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवाश्यांसाठी या भागातील प्रवासी सेवा उपलब्ध राहणार नाही याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.

Pimpri Chinchwad : मनपा कचरा नियमित उचलत नसल्याने हाऊसिंग सोसायटीतील नागरिक त्रस्त

त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक (Pune Metro News) ते फुगेवाडी स्थानक या मार्गिकेवरील प्रवासी सेवेत कोणताही बदल होणार नाही. या मार्गावरील प्रवासी सेवा सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळात नेहमीप्रमाणे सुरु राहील, असे पुणे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.