Pune Metro : गणेश विसर्जनानिमित्त मेट्रो सेवा सलग 40 तास राहणार सुरू

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जनानिमित्त (Pune Metro) पुणे मेट्रोची सेवा सलग 40 तास सुरू राहणार आहे. पुणे शहरात येणाऱ्या भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोने सेवा सुरू ठेवली आहे. आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजता सुरू झालेली मेट्रो बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. भाविक प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो कडून अधिक फेऱ्या सोडल्या जात आहेत. सात सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत या फेऱ्या वाढविल्या आहेत. 

Delhi : आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा नवा चेहरा; ‘आप’ची मोठी घोषणा

आज (मंगळवार, दि. 17) 24 तास मेट्रो सेवा सुरू (Pune Metro) आहे. 18 सप्टेंबर रोजी मेट्रो सकाळी सहा ते रात्री 10 अशी नियमित सुरू राहील. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते 18 सप्टेंबर रोजी रात्री 10 अशी मेट्रो सेवा अखंड 40 तास सुरू राहणार आहे.

youtube.com/shorts/lFkxd4OIHCM

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share