Pune : राज्यातील मेट्रो प्रकल्प ‘पांढरे हत्ती’ ठरतील -जयंत पाटील

एमपीसी न्यूज – राज्यातील मेट्रो प्रकल्प पुढील दहा वर्षात ‘पांढरा हत्ती’ ठरतील,’ असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. या प्रांल्पांचा खर्च राज्य सरकारलाच उचलावा लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील ‘बीएमसीसी’ महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

आमचे महायुतीचे सरकार सूडबुद्धीने वागणार नाही. विनाकारण कोणाचीही चौकशी करणार नाही. ज्या विभागांत आवश्यक तिथे चौकशी होणार असल्याचेही पाटील यांनी निक्षून सांगितले. सध्या नागपूर मेट्रो प्रकल्प तोट्यात आहे. तर, पुणे मेट्रोचे कामही मंदावल्याचे चित्र आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर काही वर्षे राज्य शासन पैसे देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, पंतप्रधान व मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांची भेट गरजेची आहे. दोघांमध्ये संवाद आवश्यक आहे. हा संवाद चालू राहिला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.